कान्सच्या व्यासपीठावर 'बनी'चं पहिलं पाऊल!

Hello friends picture football, on this occasion the admin wants to share an article entitled कान्सच्या व्यासपीठावर 'बनी'चं पहिलं पाऊल!, we have made good, quality and useful articles for you to read and take information in. hopefully the post content is about which we write you can understand. Alright, happy reading.

आपला चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी चित्रपटाचे निर्माते कलावंत वेगवेगळ्या कल्पक योजना आखतातठिकाणं निवडतात. आपलं प्रमोशन इतरांपेक्षा वेगळं असावंरसिकांनी त्याची दखल घेऊन आपली कलाकृती पहाण्याची उत्सुकता दाखवावीचार कौतुकाचे शब्द बोलावेत यासाठी हा सगळा प्रपंच सुरू असतो. अशीच एक चमकदार कल्पना अखून निर्माते शंकर धुरी आणि दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांनी ती प्रत्यक्षात उतरविली देखील.

आकृती क्रिएशन्स निर्मित 'बनीया चित्रपटाचा फर्स्टलूक '७५व्या 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान 'इंडिया पॅव्हेलियन'मध्ये करण्यात आला. या मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाची पहिली 'झलकपाहिल्यावर रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आणि चित्रपटाचे पोस्टर उघडताच प्रेक्षकांनी त्यासोबत सेल्फी छायाचित्रे काढत आपल्या पसंतीची पावती दिली.

आपल्या पहिल्या-वहिल्या 'बनीया चित्रपटाचं आणि प्रसिद्धीचं कॅम्पेन जगप्रसिद्ध कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सत करून मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीची नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला आहे. धुरी हे गेली अनेक वर्ष अनेक यशस्वी चित्रपटांच्या निर्मितीची कार्यकारी धुरा सांभाळत आहेत. नवोदित दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांच्या सृजनशील विचारांसोबत चित्रपट निर्मितीच्या अनुभवांचं भारदस्त गाठोडं घेऊन पदार्पण करणाऱ्या निर्माते शंकर धुरी यांची 'बनीही पहिली कलाकृती असून ती नीट आणि आशयपूर्ण पद्धतीने आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहचावी म्हणून त्यांनी कान्सचे व्यासपीठ निवडल्याचे म्हटले आहे.

आपला मराठी चित्रपट सीमोल्लंघन करून जगभरातील जिज्ञासूरसिकांसमोर या पूर्वीच पोहचला आहे. चित्रपटाचा विषय आणि त्याविषयीचं कुतुहल निर्माण करण्याचं काम गेली अनेक वर्ष आपले मराठी चित्रपट चोख करीत आहेत, "जगभरातील सुजाण प्रेक्षक आपल्या चित्रपटांचे मनःपूर्वक कौतुक करताततेव्हा खरा आनंद होतो आणि त्याहून अधिक जेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहात तिकीट काढून चित्रपट पाहतात" असे उद्गार दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांनी काढले. कान्स सोबत सुरु झालेला हा प्रवास भारतासह जगभरातील इतर मानांकित महोत्सव व पुरस्कारांमध्ये सुरु ठेवणार असल्याचे या महोत्सवाचे क्युरेटर मोहनदास यांनी सांगितले.



That's the article: कान्सच्या व्यासपीठावर 'बनी'चं पहिलं पाऊल!
Thank you for visiting my blog, hopefully it can be useful for all of you. Don't forget to share this article with your friends so they also know the interesting info, see you in other article posts.

You are now reading the article कान्सच्या व्यासपीठावर 'बनी'चं पहिलं पाऊल! with link address https://pictureupdatenews.blogspot.com/2022/05/blog-post_25.html

More Articles

Post a Comment

Νεότερη Παλαιότερη

Iklan In-Feed (homepage)

" target="_blank">Responsive Advertisement

#Advertisement